Nagpur Mahakosh Bharti महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा व कोषागारे, नागपूर विभाग, नागपूर या प्रादेशिक विभागांतर्गत सहसंचालक कार्यालय, नागपूर, कोषागार कार्यालय, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल (गट-क) (वेतनस्तर एस-१०- २९२००-९२३०० या वेतनश्रेणीत) या संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
⬇️⬇️ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा⬇️⬇️
१) आवश्यकतेनुसार वरील वेव्यपत्रकात बदल झाल्यास त्याबाबत वेळोवेळी https://mahakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येतील. अशा सूचननांचे वेळोवेळी अवलोकन करण्याची उमेदवारांनी दक्षता घ्यावयाची आहे.
२) उमेदवारांच्या संख्येस अनुसरून आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात येतील.
सेवाप्रवेश नियमानुसार किमान आवश्यक असलेली शैक्षणिक व तांत्रिक अर्हता
कनिष्ठ लेखापाल
किमान शैक्षणिक व तांत्रिक अर्हता
(१) शैक्षणिक अर्हता – सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी (२) तांत्रिक अर्हता- मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रति मिनीट किंया इंग्रजी टंकलेखनाचे ४० शब्द प्रति मिनीट वेगमयदिचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
वयोमर्यादा-१९ वर्षपिक्षा कमी नसावे, खुल्या वर्गातील व्यक्तीसाठी ३८ वर्षे व मागासवर्गीय व्यक्तीसाठी ४३ वर्षे, दिव्यांग व अनाथ व्यक्तीसाठी वयोमर्यादा ४५ वर्षापर्यंत शिथिलतम राहील. मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली वयोमयदितील शिथिलतेची सवलत यापैकी कोणतीही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील.