land record online राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील व्यक्ती त्याच्या सोयीच्या दुय्यम निबंधक कार्यालयातून जागा किंवा जमिनीचा खरेदीदस्त करु शकतो. त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून ‘एक राज्य एक नोंदणी’ उपक्रम राबविला जाणार असून त्याची कार्यवाही सध्या सुरु झाली आहे. साधारणतः नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजेच १ एप्रिलपासून या नवीन निर्णयानुसार अंमलबजावणी होणार आहे.
राज्य सरकारने आणलेल्या नवीन नियम पाहण्यासाठी
राज्यात सर्रासपणे प्रत्येक तालुक्यात जागा किंवा जमिनी, घरांच्या खरेदी-विक्रीसाठी दुय्यम निबंधक कार्यालय आहे. पण, सध्या या कार्यालयाची हद्द त्या त्या तालुक्यापुरतीच मर्यादित आहे. एका तालुक्यातील व्यक्ती दुसऱ्या तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयातून खरेदीदस्त करु शकत नाही, अशी सद्यः स्थिती आहे. अनेकदा काही कार्यालयांबाहेर खरेदी-विक्रीसाठी मोठी गर्दी असते आणि अशावेळी व्यवहारासाठी विलंब लागतो व काहीवेळा देणारा किंवा घेणाऱ्याकडून व्यवहार देखील रद्द होतात. पण, ‘एक राज्य एक नोंदणी’च्या निर्णयामुळे दुय्यम निबंधक कार्यालयांबाहेरील गर्दी कमी होणार आहे.
राज्य सरकारने आणलेल्या नवीन नियम पाहण्यासाठी
तसेच खरेदीदस्तासाठीचा वेळ देखील कमी होणार असून व्यवहार वाढून महसुलातही वाढ होण्याची आशा आहे. मुद्रांक शुल्क विभागाने महसूल विभागाच्या मदतीने ‘एक राज्य एक नोंदणी’च्या दृष्टीने कार्यवाही सुरु केली असून सुरवातीला काही दिवसांसाठी एका जिल्ह्यात हा पायलट प्रोजेक्ट राबविला जाणार आहे. त्यानंतर राज्यभर त्याची अंमलबजावणी होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्य सरकारने आणलेल्या नवीन नियम पाहण्यासाठी
सामान्यांसाठी ऐतिहासिक ठरणार मुख्यमंत्र्यांच्या निर्णय
मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे ‘एक राज्य एक नोंदणी’ अंतर्गत कोणत्याही व्यक्तीला राज्यभरातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयातून जागा, जमिनीच्या खरेदी-विक्रीचा दस्त करता येईल. त्यादृष्टीने विभागाचे सध्या युध्दपातळीवर नियोजन सुरु असून आगामी नवीन आर्थिक वर्षापासून ही सोय सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय सामान्यांसह सर्वच व्यक्तींसाठी ऐतिहासिक ठरणार आहे.
– अशोक पाटील, सह नोंदणी महानिरीक्षक, महाराष्ट्र
1880 पासून चे जमिनीचे सातबारे उतारे पहा आता मोबाईलवर
विशेष उपक्रमाचे फायदे…
गर्दीच्या वेळी खरेदीदस्तास विलंब होतो व दूरवरुन आलेल्यांचा वेळ वाया जातो. या निर्णयामुळे खरेदीदस्तास विलंब होणार नाही.
सातबारा उताऱ्यावरील व्यक्तींना खरेदीदस्तासाठी शेकडो किलोमीटर अंतरावरुन आणावे लागणार नाही,
खरेदीदस्त लवकर व्हावा म्हणून कोणाला पैसे द्यावे लागणार नाहीत आणि अशा प्रकारांना कायमचा आळा
बसेल.
विनाविलंब व विनाअडथळा कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीदस्त होत असल्याने व्यवहार वाढून महसूलही वाढण्याची आशा
गुंठेवारीचा मार्ग मोकळा ! 1-2 गुंठे जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करता येणार,
नऊ महिन्यांत ५० हजार कोटींचा महसूल
महसुलाचे वार्षिक उद्दिष्ट
५०,००० कोटी
एप्रिल ते डिसेंबरपर्यंतचे दस्त
२७,९०,१९१
मिळालेला महसूल
५०,०११.५ कोटी
मार्चपर्यंत आणखी अपेक्षित महसूल
१०,००० कोटी