राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील व्यक्ती त्याच्या सोयीच्या दुय्यम निबंधक कार्यालयातून जागा किंवा जमिनीचा खरेदीदस्त करु शकतो. त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून ‘एक राज्य एक नोंदणी’ उपक्रम राबविला जाणार असून त्याची कार्यवाही सध्या सुरु झाली आहे. साधारणतः नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजेच १ एप्रिलपासून या नवीन निर्णयानुसार अंमलबजावणी होणार आहे.