नागपूर विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय भरती 2025,लगेच अर्ज करा

Nagpur Mahakosh Bharti महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा व कोषागारे, नागपूर विभाग, नागपूर या प्रादेशिक विभागांतर्गत सहसंचालक कार्यालय, नागपूर, कोषागार कार्यालय, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल (गट-क) (वेतनस्तर एस-१०- २९२००-९२३०० या वेतनश्रेणीत) या संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कार्यवाहीचा टप्पा दिनांक व कालावधी
१. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी दि. १०.०१.२०२५ रोजी १७.०० वाजल्यापासून दि. ०९.०२.२०२५ रोजी २३.५९ वाजेपर्यंत.
२.ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दि. ०९.०१.२०२५ रोजी २३.५९ वाजेपर्यंत.
३. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे याबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल.
४.ऑनलाईन परीक्षेचा दिनांक याबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल.

 

⬇️⬇️ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा⬇️⬇️

Important Links
जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज  [Starting: 10.01.25] Apply Online
अधिकृत वेबसाईट Click Here

 

१) आवश्यकतेनुसार वरील वेव्यपत्रकात बदल झाल्यास त्याबाबत वेळोवेळी https://mahakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येतील. अशा सूचननांचे वेळोवेळी अवलोकन करण्याची उमेदवारांनी दक्षता घ्यावयाची आहे.

२) उमेदवारांच्या संख्येस अनुसरून आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात येतील.

सेवाप्रवेश नियमानुसार किमान आवश्यक असलेली शैक्षणिक व तांत्रिक अर्हता

कनिष्ठ लेखापाल

किमान शैक्षणिक व तांत्रिक अर्हता

(१) शैक्षणिक अर्हता – सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी (२) तांत्रिक अर्हता- मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रति मिनीट किंया इंग्रजी टंकलेखनाचे ४० शब्द प्रति मिनीट वेगमयदिचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

वयोमर्यादा-१९ वर्षपिक्षा कमी नसावे, खुल्या वर्गातील व्यक्तीसाठी ३८ वर्षे व मागासवर्गीय व्यक्तीसाठी ४३ वर्षे, दिव्यांग व अनाथ व्यक्तीसाठी वयोमर्यादा ४५ वर्षापर्यंत शिथिलतम राहील. मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली वयोमयदितील शिथिलतेची सवलत यापैकी कोणतीही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील.

 

Leave a Comment